ऑनलाईन टीम
राष्ट्रीय सामाईक प्रवेश परीक्षा (जेईई) आणि राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट) नियोजित वेळेतच होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत असतानाच नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए)ने ही माहिती दिली आहे. याबाबत एनटीएने वेबसाईटवर अधिकृत माहिती प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार जेईई मुख्य परीक्षा आता ठरल्याप्रमाणे १ ते ६ सप्टेंबर दरम्यानच होणार आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु, एनटीएने ठरल्या वेळेतच परीक्षा होणार असल्याचे सांगतिले आहे. त्यामुळे आता जेईई मुख्य परीक्षेसोबतच नीट परीक्षाही वेळेतच होणार असून ती १३ सप्टेंबरलाच असणार आहे. दरम्यान, यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयानेही नीट आणि जेईई परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी फेटाळली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









