अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने बॉलिवूड चित्रपटांमध्ये अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम करून स्वतःची ओळख तयार केली आहे. प्रत्येक मोठय़ा चित्रपटात जॅकलिनची उपस्थिती दिसून येते. पण जॅकलीन आता हॉलिवूडमध्येही स्वतःचा ठसा उमटवू पाहत आहे. लवकरच तिचे हॉलिवूडमध्ये पदार्पण होणार आहे.
एका बिग बजेट हॉलिवूड चित्रपटात ती दिसून येणार आहे. या चित्रपटात तिला अनेक ऍक्शन दृश्ये करण्याची संधी मिळणार आहे. याचबरोबर तिचा बोल्ड अवतारही दिसून येईल. तिचे एक मोठे आणि स्मरणीय हॉलिवूड पदार्पण होणार आहे.
जॅकलिनपूर्वी दीपिका पदूकोन, प्रियंका चोप्रा आणि इरफान खान यांनीही हॉलिवूडमध्ये स्वतःचा ठसा उमटविला आहे. जॅकलिनने हॉलिवूडपटासाठी तयारी सुरू केली आहे. ऍक्शन दृश्यांसाठी ती विशेष प्रशिक्षण घेत आहेत. जॅकलिनकडे सध्या अनेक बॉलिवूड चित्रपट आहेत. अक्षय कुमारसोबत ती बच्चन पांडे चित्रपटात दिसून येणार आहे. तसेच रामसेतू चित्रपटातही ती महत्त्वाच्या भूमिकेत आहे.









