वृत्तसंस्था/ रोम
कोपा इटालियन चषक फुटबॉल स्पर्धेत जुवे स्क्वीझ संघाने अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. शुक्रवारी झालेल्या सामन्यात जुवेंटस् संघातील पोर्तुगालचा फुटबॉलपटू ख्रिस्टीयानो रोनाल्डोने पेनल्टीवर गोल करण्याची संधी गमावली पण 10 खेळाडूंनीशी खेळणारा एसी मिलान बरोबरचा सामना जुवेंटस्ने गोलशून्य बरोबरीत राखला.
आता या स्पर्धेतील अंतिम सामना येत्या बुधवारी होणार आहे. या स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या पहिल्या टप्प्यातील सामना जुवेंटस्ने 1-1 असा बरोबरीत राखला होता. नापोली आणि इंटर मिलान यांच्यातील सामना खेळविला जाणार असून या सामन्यानंतर सदर स्पर्धेतील अंतिम फेरीच्या सामन्यात जुवेंटस्चा प्रतिस्पर्धी संघ निश्चित होईल. शुक्रवारच्या सामन्यात 16 व्या मिनिटाला जुवेंटस्ला पेनल्टीची संधी मिळाली पण रोनाल्डोला या संधीचा फायदा घेता आला नाही.
या सामन्यातील उत्तरार्धात 35 वर्षीय रोनाल्डोला संघाला मिळालेल्या दुसऱया पेनल्टीवर गोल करता आला नाही. या सामन्यात एसी मिलानच्या रिबेकला पंचांनी लालकार्ड दाखवून मैदानाबाहेर काढल्याने या संघाला किमान 70 मिनिटांच्या कालावधी 10 खेळाडूंनिशी खेळावे लागले.









