वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
सरकारकडून सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 31.71 कोटी पॅन नंबर आधारला लिंक करण्यात आल्याचे सांगितले आहे. यामध्ये 29 जूनपर्यंत 50.95 कोटी पॅन अलॉट करण्यात आले आहेत. आतापर्यंत 18 कोटीपेक्षा अधिक पॅनकार्ड आधारकार्डला लिंक करण्यात आले नसल्याची माहिती आहे.
सरकारकडून या अगोदरच आधारला पॅनशी जोडण्याची तारीख वाढवून 31 मार्च 2021 केली आहे. सदर तारखेपर्यंत आधार-पॅन लिंक न केल्यास आपला पॅन नंबर निष्क्रिय होऊ शकतो.
आपले पॅन निष्क्रिय होणे म्हणजे काय? नियमानुसार जर आपले पॅन निष्क्रिय झाले आणि याचा वापर बँकेच्या देवाण घेवाण किंवा अन्य ठिकाणी वापर करावयाचा असल्यास त्या ठिकाणी आपले पॅन दिले नसल्याची कायद्यानुसार नोंद होणार आहे. कारण इनकम टॅक्स कायद्याचे कलम 272 बी च्या अंतर्गत 10 हजार रुपयांचा दंड होणार असून कलम 139 ए अंतर्गत मागणी करण्यात आल्यावर पॅन दाखविणे बंधनकारक असल्याचा खुलासाही करण्यात आला आहे.