मंत्री गोयल यांची माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशाच्या निर्यात क्षेत्रात उल्लेखनीय सुधारणा होत असल्याचे पहावयास मिळत असून जुलै महिन्यातील निर्यात ही मागील वर्षाच्या समान महिन्याच्या बरोबरीत झाली असल्याचे प्रतिपादन वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनी केले आहे. सदरच्या कामगिरीमुळे देशातील आर्थिक प्रवासामध्ये सुधारणा होत असल्याचे संकेत मिळत असल्याचेही गोयल यांनी म्हटले आहे.
जुलै 2019 मध्ये जवळपास 90 टक्के निर्यातीचे आकडे प्राप्त करण्याचा प्रयत्न केला असून तेलासंबंधीत निर्यात यातून बाजूला केली आहे. कारण ज्याचे मूल्य हिशोबाच्या बाबतीत खूपच कमी आहे. आज देशात सर्व पातळीवर प्रयत्न करुन आर्थिक स्थिती रुळावर आणण्याचा प्रयत्न करण्यावर भर दिला जात असून आपल्या सर्वांना आत्मनिर्भर बनण्याची गरज असून आगामी काळात स्वदेशी उत्पादनात गुणवत्ता निर्माण करत अन्य सुधारणा करण्यावर भर देण्याची गरज असल्याचेही गोयल यांनी म्हटले आहे. जूनपर्यंत सलग चौथ्या महिन्यात देशाची निर्यात घसरत आली आहे. याच दरम्यान आयातीमध्येही 47.59 टक्क्मयांची घसरण नोंदवली आहे.









