कराड / प्रतिनिधी
येथील जुना कोयना पुल दोन दिवस बंद करून त्यावरून किती क्षमतेची वाहने जाऊ शकतात, याची तपासणी नुकतीच करण्यात आली. येत्या आठवडाभरात या पुलावरून चार चाकी हलकी वाहतूक सुरू होईल, अशी माहिती माझी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
गुरुवारी चव्हाण यांनी जुन्या कोयना पुलाची पाहणी केली. यावेळी युवा नेते उदयसिंह पाटील, शिवराज मोरे, नगरसेवक राजेंद्र माने, झाकीर पठाण, सिद्धार्थ थोर वडे, रमेश वायदंडे ज्ञानदेव राजापुरे, पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, नगर अभियंता एन. एस. पवार व बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.