11 जणांना अटक, 12 हजार 400 रुपये जप्त, शहापूर पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी / बेळगाव
जुने बेळगाव येथील कनकदासनगरमधील सार्वजनिक ठिकाणी जुगार खेळणाऱया 11 जुगाऱयांना शहापूर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 12 हजार 400 रुपये जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे जुने बेळगाव परिसरात खळबळ उडाली असून जुगारी अड्डे चालविणाऱयांचे धाबे दणाणले आहेत.
जुने बेळगाव येथील कनकदासनगरमध्ये जुगार सुरू असल्याची माहिती शहापूर पोलिसांना मिळाली. शहापूर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ व त्यांच्या सहकाऱयांनी मंगळवारी ही कारवाई केली आहे.
विजय प्रकाश यलजी (वय 41), मनोज सदाशिव कुरबर (वय 26), जाफर हुसेनमीया बाबाखान (वय 33), इराप्पा वागुकर (वय 32), मारुती नागाप्पा बुचडी (वय 32, सर्व रा. कनकदासनगर), मंजुनाथ गोपाळ काकती (वय 38, रा. बसवाण गल्ली-खासबाग), गणपती नर्सिंग ढगे (वय 51, रा. भारतनगर, शहापूर), मनोज गुंडू पवार (वय 52, रा. लक्ष्मी गल्ली, जुने बेळगाव), नागेश नारायण हेरेकर (वय 48), मेहबुब दिलावर कर्नाचे (वय 48, दोघेही रा. मारुती गल्ली-खासबाग), कृष्णा नर्सिंग ढगे (वय 69, रा. भारतनगर, शहापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या सर्वांवर शहापूर पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.









