वार्ताहर/ जुने गोवे
जुने गोवे पोलिसांनी पोलिस स्थानक क्षेत्रात अंमली पदार्थ विरोधी राबविलेल्या मोहीमेत सुमारे 1 लाख 75 हजार सहाशे ऊपये किंमतीचा 1756 ग्राम गांजा जप्त करून संशयित चौघांना अटक केली. पोलिसांनी वेगवेगळ्या चार ठिकाणी ही कारवाई केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या घटनेत हेल्थ वे हॉस्पिटलच्या मागच्या बाजूला छापा माऊन गणराज यशवंत रवंडीकर (23) राहणार नारायण नगर, होंडा सत्तरी याला सुमारे 70000/ हजार ऊपये किंमतीचा 700 ग्राम गांजा सह रंगेहाथ पकडले.
दुसऱ्या घटनेत पोस्टवाडा, होंडा, सत्तरी येथील रहिवासी अभय रामा गावकर (20) याला सुमारे 52,700/ ऊ किंमतीचे 527 ग्राम गांजा सह रंगेहाथ पकडले. पंचनामा करून दोघांकडील अंमली पदार्थ जप्त करण्यात आला असून दोघांनाही अटक करण्यात आली. ही कारवाई उपनिरीक्षक सुदन रेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तिसऱ्या घटनेत पोलिसांना मिळालेल्या खात्रीलायक माहितीवऊन चिंबल उतरणीवर इंदिरा नगर चिंबल येथील रहिवासी लतिफ सुलेमान तलवाई याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्या जवळ सुमारे 25,800/ ऊ किंमतीचा 258 ग्राम गांजा सापडला. तर चौथ्या घटनेत बिहार येथील रहिवासी सूरज रामप्रताप (30) याची संशयावरून पोलिसांनी झडती घेतली असता त्याच्या जवळ सुमारे 27100/ ऊ किंमतीचा 271 ग्राम गांजा सापडला. पंचनामा करून दोघां कडील अंमली पदार्थ जप्त केला. उपनिरीक्षक विराज धाऊसकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. चौघाही संशयितांना अटक करण्यात आली असून जुने गोवे पोलिस पुढील चौकशी करीत आहे.









