प्रतिनिधी / कोल्हापूर
बेकायदेशीर खासगी सावकारी करत असलेल्या एकावर गुरुवारी सहकार विभागाने धाड टाकली. या धाडीत त्याच्याकडून संशयास्पद कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. रोहन मारुती जाधव अवधुत गल्ली, जुने पद्माराजे हायस्कूल समोर सोन्या मारुती चौक, जुना बुधवार पेठ असे त्या सावकाराचे नाव आहे. जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे यांच्या नेतृत्चाखालील पथकाने ही कारवाई केली.
खासगी सावकार रोहण जाधव यांचे विरोधात जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे तक्रार दाखल झाली होती, या तक्रारीवरी सहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे यांच्या पथकाने गुरुवारी सकाळी जाधव यांच्या राहाते घरावर छापा टाकला. या कारवाईत कच्चा नोंदी असलेल्या वहय़ा, डायरी, कोरे व लिखित धनादेश, हस्तलिखित बाँड, संचकार पत्रे, स्टँम्प पेपर, खरेदी दस्त, भिशी नोंदवही. जमीनी संबधी कागदपत्रे आदी संशयीत कागदपत्रे हस्तगत केली आहेत. या पथकामध्ये एक अधिकाऱयासह 8 कर्मचारी, 7 पोलीस कर्मचाऱयांचा समावेश होता.
निर्भयपणे तक्रार करा
खासगी सावकाराविरोधात शासनाने कडक कायदे केले आहेत. तक्रारदाराबाबत गोपनियता पाळली जाते. त्यामुळे पिळवणूक झालेल्यांनी निर्भयपणे तक्रार करावी. सहकार विभागाकडून खासगी सावकारावर कारवाई केली जाईल
अमर शिंदे, – जिल्हा उपनिबंधक कोल्हापूर.








