प्रतिनिधी /बेळगाव
अंबाभुवन जवळील पुरोहित लॉजमध्ये जुगार खेळणाऱया 11 जुगाऱयांना सोमवारी अटक करण्यात आली. कॅम्प पोलिसांनी ही कारवाई केली असून त्यांच्या जवळून 70 हजार 360 रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे, खडेबाजारचे एसीपी ए. चंद्राप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्पचे पोलीस निरीक्षक प्रभाकर धर्मट्टी, पी. जी. डोळ्ळी, एम. वाय. हुक्केरी, आर. एस. पुजेरी, बी. बी. गौडर, के. एम. बनोशी, एम. ए. पाटील, आर. एम. कांबळे, बी. एम. नरगुंद, बी. एस. रुद्रापूर, व्ही. एफ. कलखांबकर, एस. एच. तळवार, ए. बी. घट्टद व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे.
या संबंधी पोलीस आयुक्तांनी सोमवारी रात्री एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. पुरोहित लॉजमध्ये अंदर-बाहर जुगार सुरू असल्याची माहिती मिळताच अचानक छापा टाकून 11 जुगाऱयांना अटक करण्यात आली आहे. सर्व 11 जणांवर येथील कॅम्प पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
तौसीफ शेखअहम्मद बेपारी (रा. फिश मार्केट कॅम्प), शिवाजी रामचंद्र खोत (रा. पहिला रेल्वेगेट, टिळकवाडी), युसुफ इलाई तडकोड (रा. उज्ज्वलनगर), गजानन महादेव सूर्यवंशी, प्रदीप कशोक उचगांवकर (दोघेही रा. पाटीलमळा), विक्रम मोहनसिंग राजपुरोहित (रा. मठ गल्ली), सलीम अब्दुलमुनाफ मुजावर (रा. मुजावर गल्ली), राहुल सुरेश चौगुले (रा. भांदुर गल्ली), समीर हानीफसाब जत्ती (रा. आझादनगर), समीर इब्राहिम कागजी (रा. उज्ज्वलनगर), इरफान महम्मदहुसेन कलादगी (रा. आझादनगर) अशी अटक करण्यात आलेल्या जुगाऱयांची नावे आहेत.









