पणजी / प्रतिनिधी
कोविड-19 महामारीचा विचार करता जीसीईटी-2020 परीक्षा 05 व 6 मे 2020 दरम्यान घेण्यात येणार होती ती स्थगित करून जून 2020 किंवा त्यानंतर घेण्यात येणार असल्याचे तांत्रिक शिक्षण केंद्रीकृत प्रवेश विभाग संचालनालयातर्फे कळविण्यात आले आहे.
जेईई आणि एनईईटी तारखांच्या घोषणा तसेच इतर कोणत्याही अडथळय़ांच्या अधीन आहे, जीसीईटी-2020 च्या परीक्षेच्या अचूक तारखा परीक्षा घेण्याच्या 10 दिवस अगोदर अधिसूचित केल्या जातील. प्रॉस्पेक्टसमध्ये अधिसूचित केलेल्या इतर सर्व प्रवेश संबंधित उपक्रमांचे वेळापत्रक सुधारित केले जाईल व त्याची वेळेवर अधिसूचना केली जाईल.









