प्रतिनिधी/ पणजी
नोकरीत कायम करा म्हणून मागणी करणाऱया जीवरक्षकांनी आता सत्याग्रह सुरु केला असून मागणी पूर्ण होईपर्यंत कायदेशीर ज्या ज्या गोष्टी करता येईल त्या सर्व गोष्टी करणार असल्याचे अजितसिंग राणे यांनी सांगितले. जीवरक्षकांनी काल शनिवारी लाक्षणीक धरणे कार्यक्रमा आझाद मैदानावर आयोजित केला होता त्यावेळी राणे पत्रकारांशी बोलत होते. मुखमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे खोटी विधाने करून जीवरक्षकांना त्यांच्या हक्का पासून डावलण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला आहे.
आपल्या प्रलंबीत मागणीसाठी जीवरक्षक गेल्या अडीच महिन्यापासून संप करीत आहेत. सरकार मात्र त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे. या कामगरांनी आता जावे कुठे आसा प्रश्न निर्माण झाला आहे. अधिकाधिका कामगरांचे वय उलटून गेले आहे त्यांना आता नोकरी मिळणे शक्य नाही अशा स्थितीत या कामगारांनी आता काय करावे असाही प्रश्न निर्माण झाला आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सांगत आहेत की जे कामगार जीव रक्षक म्हणून काम करत होते ते दृष्टी कंपनीचे होते त्यांचे सरकारशी देणे घेणे काहीच नाही त्यामुळे सरकार त्यांच्यासाठी काहीच करू शकत नाही. परंतु जे कामगार दृष्टी कंपनीत काम करीत होते ते गोमंतकीय आहेत आणि त्यांच्यावर अन्याय होत आहे हे मुख्यमंत्र्यांना दिसत नाही काय असा प्रश्न अजितसिंग राणे यांनी उपस्थित केला आहे. गोमंतकीय जनते पेक्षा दृष्टी कंपनीचा पुळका सरकारला अधिक की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. एखाद्या कंपनीला किंवा एखाद्या संस्थेला सरकारी तिजोरीतील पैसे दिले जात असतील आणि त्या कंपनीत किवा त्या संस्थेत जे कर्मचारी काम करतात ते कामगार घटनेनुसार अप्रत्येक्षपणे सरकारी कामगार असतात त्यांच्यावर अन्याय होत असेल तर ते सरकारकडे न्याय मागतील आणि सरकारने त्यांना न्याय देणे बंधनकारक आहे. असे असताना मुख्यमंत्री बेताळ वक्तव्य का करीत आहेत असे अजितसिंग राणे यांनी सांगितले.
गेल्या अडीज महिन्या पासून संपावर असलेल्या जीवरक्षकांनी आपल्या आंदोलनाची प्रखरता वाढवीली असून आज शनिवार पासून लाक्षणिक धरणे, उपोषणे असे कार्यक्रम दर दिवशी सुरुच रहाणार असल्याचे राणे यांनी सांगितले. अखिल भारतीय कामगार संघटनेशी सल्लघन्न असलेले जिवरक्षक कामगार संघटनेला कामगार संघटनेचा पूर्ण पाठिंबा असून त्यांची मागणी पूर्ण होईपर्यंत कामगार संघटना त्यांच्या पाठीशी राहिल असेही राणे यांनी सांगितले.









