भारतीय दलित महासंघाचे कोडोलीत आंदोलन
वारणानगर / प्रतिनिधी
पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस व जीवनावश्यक वस्तुंच्या दरवाढी संदर्भात केंद्र सरकारचा भारतीय दलित महासंघाच्या वतीने कोडोली ता. पन्हाळा येथील सर्वोदय चौकात जाहीर निषेध करण्यात आला असून याबाबतचे निवेदन कोडोली पोलीसांना देण्यात आले. यावेळी जीवनावश्यक वस्तुंची दरवाढ करून शेतकरी कष्टकरी, मजुर, कामगार व उपेक्षित आर्थिक दुर्बल महागाईच्या खाईत लोटणाऱ्या बेजबाबदार केंद्र सरकारचा जाहीर निषेध करून नोटाबंदी ते कोरोना महामारी दरम्यान आर्थिक विवंचनेत सापडलेल्या सर्वसामान्य आर्थिक दुर्बल घटक दिवसेंदिवस वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे व महागाईमुळे त्रस्त झाला त्यांना वेठीस धरत आहे. बहुमताच्या बळावर केंद्रसरकार नागरिकांवर आपला निर्णय लादून आहे. पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस व जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती महागल्या असून शेतकरी कष्टकरी, मजूर, कामगार व आर्थिक दुर्बल घटकांच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून परिणामी त्यांच्या आत्महत्येच्या , लहान मुलांच्या कुपोषणाच्या व मृत्युच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
केंद्र सरकारच्या पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस व जीवनाश्यक वस्तुंच्या दरवाढीचा निर्णय म्हणजे देशात अघोषित आणिबाणी व अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. केवळ उदयोगपती, भांडवलदार, दलाल यांच्या आर्थिक फायदयासाठी केंद्रसरकाने हा निर्णय घेतला असून सर्वसामान्य आर्थिक दुर्बल घटकाला हा दडपण्याचा व लाचार करणेचा हा प्रयत्न आहे. केंद्रसरकने शेतकरी, कष्टकरी, कामगार, मजूर व सर्वसामान्य आर्थिक दुर्बल कांच्य मानसिकते व परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून पेट्रोल, डिझेल, घरगुती व जीवनावश्यक वस्तुंची दरवाढ तात्काळ मागे घ्यावी व मानवी हानी टाळावी. शासन व प्रशासनाने सदरच्या आंदोलनाची व निवेदनाची संवेदनशीलरित्या गांभीर्याने दखल घ्यावी अशी विनंती. देखीत निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत कांबळे, अमर काळे, बबलु चौगले, श्रीकांत कांबळे, अमोल कांबळे, विक्रमसिंह समुद्रे, बंशी कांबळे, पन्नालाल इंगळे, मनोज गायकवाड, नरेश कांबळे, अभिजित बनसोडे, अमित गायकवाड, आकाश कांबळे, विजय हिरवे, राजेंद्र दाभाडे, दयानंद कांबळे आदी कार्यकर्ते या निषेध आंदोलनात सहभागी झाले होते.