ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले आहे. भारत सरकारच्या ताज्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये सकल देशांतर्गत उत्पादनात 7.3 टक्क्यांनी घट झाली आहे. याउलट मागील वर्षी (2019-20) 4 टक्के वाढ नोंदविली होती. तिमाही आधारावर कामगिरी चा विचार करता, मार्च 2020 च्या तिमाहीत 3 टक्क्यांच्या तुलनेत यावर्षी मार्च तिमाहीत वाढीचा दर 1.6 टक्के होता.
आर्थिक वर्ष 2020-21, एप्रिल-जून या पहिल्या तिमाहीत देशाच्या अर्थव्यवस्थेत 23.90 टक्क्यांनी घट झाली. जुलै-सप्टेंबर या तिमाहीत अर्थव्यवस्था 7.5 टक्क्यांनी घसरली होती. ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत देशाच्या अर्थव्यवस्थेत 0.40 टक्के वाढ झाली होती. दुसरीकडे, जानेवारी-मार्च तिमाहीत चीनने 18.30 टक्के वाढ नोंदविली होती.









