केंद्रीयमंत्री भागवत कराड यांना निवेदन
कुपवाड / प्रतिनिधी
राज्यातील औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांना आपला माल पाठविताना जीएसटीमध्ये अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. जीएसटी रिटन्सची माहिती वेळेवर पाठविणे अडचणीचे होते. त्यामुळे जीएसटीमधील जाचक तरतूदी संदर्भात केंद्र शासनाने फेरविचार करावा, अशी मागणी कृष्णाव्हॅली चेंबरच्या शिष्टमंडळाने केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावर तोडगा काढून उद्योजकांच्या अडचणीबाबत कृष्णाव्हॅली चेंबरमध्ये लवकरच उद्योजकांची बैठक घेणार असल्याची ग्वाही मंत्री भागवत कराड यांनी यावेळी शिष्टमंडळाला दिली.









