पदवीपूर्व महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
पदवीपूर्व शिक्षण खाते व नेमव्वा कुडची पदवीपूर्व महाविद्यालय आयोजित जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत जीएसएस, गोगटे, सेंट पॉल्स संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
विद्यानिकेतन येथील मैदानावर या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विक्रम पाटील, बी. डी. कुडची, आय. बी. कुंभार, जी. एन. पाटील, एच. एस. शिंगाडे, शिव नायकर आदी मान्यवर उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते मैदानाची पूजा केल्यानंतर फुटबॉलला किक मारून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेत 22 संघांनी तर महिला संघांनीही भाग घेतला आहे. गोगटे महाविद्यालयाने आरएलएसचा 1-0, सेंट पॉल्सने आरपीडीचा टायब्रेकरमध्ये 4-3 तर जीएसएसने खानापूर संघाचा 1-0 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
चौथा उपांत्यपूर्व फेरीचा सामना मंगळवारी सकाळी खेळविण्यात येणार असून त्यानंतर दोन उपांत्य व अंतिम सामना खेळविण्यात येणार
आहे.









