प्रतिनिधी/ बेळगाव
जीएसएस कॉलेजच्या रोट्रक्ट क्लबचा दुसरा अधिकारग्रहण सोहळा नुकताच पार पडला. साहाय्यक प्रांतपाल अजय हेडा यांच्या हस्ते अधिकार देण्यात आले. रोटरी ई क्लबचे अध्यक्ष नागतिलक गणिकोप, सचिव कविता कणगणी, डॉ. पी. टी. हणमगौंड हे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. एन. डी. हेगडे यांनी ऑनलाईन उपस्थिती लावली होती.
यावेळी अजय हेडा म्हणाले, समाजाची प्रगती करण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाने घेऊन मेहनती वृत्ती, त्याचबरोबर देशाचा विकास करण्यासाठी आपण रोटरीचे धोरण सर्वांपर्यंत पोहोचवावे, असे त्यांनी सांगितले. क्लबच्या अध्यक्षपदी प्रणव पाश्चापुरे, सचिव गौरी हुबळा, खजिनदारपदी अभिलाषा दिवटगी यांची निवड करण्यात आली.
सचिव ग्रेस गायकवाड यांनी मागील वर्षाच्या अहवालाचे वाचन केले. माजी अध्यक्ष ओमकार अणवेकर, साहिल गांधी, अनिकेत जाधव यांसह इतर सदस्य उपस्थित होते. गौरी हुबळी यांनी आभार मानले.









