क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
पदवीपूर्व शिक्षण खात्यातर्फे सरस्वती पदवीपूर्व महाविद्यालय आयोजित जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत जीएसएस पदवीपूर्व महाविद्यालयाची कराटेपटू सृष्टी स्वप्नील जाधव हिने सुवर्ण पटकाविले.
कोल्हापूर क्रॉस स्पोर्ट्स हॉस्टेलच्या सभागृहात आयोजित शिक्षण खात्याच्या कराटे स्पर्धेत 35 ते 40 किलो वजनी गटात सृष्टी जाधवने किर्तना सुतार हिचा 5-1 असा पराभव करीत विजेतेपदासह सुवर्णपदक पटकाविले. तिला जिल्हा कराटे संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र काकतीकर यांच्या हस्ते पदक, प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
सृष्टीला प्रशिक्षक दीपक काकतीकर, अमित वेसने यांचे बहुमोल मार्गदर्शन, क्रीडा प्राध्यापक विनय नाईक, प्राचार्य प्रणव पित्रे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.









