विशेष पुरस्काराचीही घोषणा : वैभववाडी तालुक्याला दोन पुरस्कार : मालवण, कुडाळमधून प्रस्तावच नाही
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक पुरस्कार अखेर जाहीर करण्यात आले आहेत. सात शिक्षकांना पुरस्कार जाहीर करण्यात आले असून यामध्ये एका विशेष पुरस्काराचा समावेश आहे. कुडाळ व मालवण तालुक्यामधून प्रस्ताव न आल्याने दोन्ही तालुक्मयांची पुरस्काराची पाटी कोरी राहिली आहे. वैभववाडी तालुक्मयात दोन शिक्षकांना पुरस्कार मिळाले आहेत. दरम्यान, शिक्षक दिनादिवशीच 5 सप्टेंबरला पुरस्कार वितरण करून शिक्षकांचा सन्मान केला जाणार आहे, अशी माहिती जि. प. अध्यक्षा संजना सावंत व उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी दिली.
जिल्हा परिषदेमार्फत दरवषी आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येते. गतवषी काही कारणास्तव पुरस्कार देता आले नव्हते. त्यामुळे यावषी वेळेत प्रस्ताव मागवून घेण्यात आले व कोकण आयुक्तांच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आले होते. आयुक्तांनी मान्यता दिल्यानंतर बुधवारी पुरस्कार जाहीर करण्यात आले.
पुरस्कार प्राप्त शिक्षकांमध्ये देवगड तालुक्मयातील उपशिक्षक बापू सोनू खरात, कणकवली तालुक्मयातील पदवीधर शिक्षिका प्रतीक्षा प्रसाद तावडे, वेंगुर्ले तालुक्मयातील उपशिक्षक तेजस विश्वनाथ बांदिवडेकर, सावंतवाडी तालुक्मयातील उपशिक्षक नितीन नामदेव सावंत, वैभववाडी तालुक्यातील पदवीधर शिक्षिका स्नेहलता जगदीश राणे, दोडामार्ग तालुक्मयातील उपशिक्षक दिग्विजय नागोजी फडके यांना विशेष पुरस्कार आणि वैभववाडी तालुक्मयातील उपशिक्षक संदीप जनार्दन शेळके यांची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठो निवड करण्यात आली आहे.
शिक्षक पुरस्कार प्राप्त सर्व शिक्षकांचे अध्यक्षा संजना सावंत, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, सभापती शिक्षण व आरोग्य डॉ. अनिशा दळवी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी अभिनंदन केले आहे.
शिक्षक दिनादिवशीच होणार वितरण
शिक्षक दिनादिवशीच पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात येऊन मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सन्मान केला जाणार आहे, अशी माहिती जि. प. अध्यक्षांनी दिली.









