साटेली- भेडशी / प्रतिनिधी:
माजी जि प उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांची मध्यस्ती यशस्वी. अखेर आज मंगळवारी साटेली- भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका मिळावी यासाठी सरपंच सेवा संघ जिल्हा संघटक प्रविण गवस यांनी केलेल्या उपोषणात माजी जि प उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांनी यशस्वी मध्यस्ती करत जि प अध्यक्ष संजना सावंत यांच्याशी चर्चा करत सतरा तारीखला ओरोस येथे बैठक घेऊन साटेली भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका सुपूर्द केली जाईल असे आश्वासन दिले होते त्या शब्दाप्रमाणे जि. प.अध्यक्ष संजना सावंत यांनी आज ओरोस येथे रुग्णवाहिका सुपूर्द केली. यावेळी जि प उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर ,माजी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी , शिक्षण आरोग्य सभापती डॉ अनिशा दळवी ,समाज कल्याण सभापती अंकुश जाधव आंदोलनकर्ते प्रवीण गवस ,साटेली भेडशी सरपंच लखू खरवत ,वैद्यकीय अधिकारी डॉ गजानन सारंग ,संजय विरनोडकर तसेच आदी जि प सदस्य ,पदाधिकारी उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









