प्रतिनिधी/ पणजी
राज्यातील 48 जिल्हा पंचायतींसाठी शनिवारी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी उद्या दि. 14 रोजी होणार आहे. त्यासाठी एकूण 15 केंद्रे राज्य निवडणूक आयोगातर्फे अधिसूचित करण्यात आली आहेत. त्यानुसार प्रत्येक केंद्रावर सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी प्रारंभ होणार असल्याचे कळविण्यात आले आहे.
त्यानुसार उत्तर गोव्यात तिसवाडी तालुक्यातील ताळगाव, सांताक्रूज, चिंबल, आगशी आणि खोर्ली या मतदारसंघासाठी कांपाल इनडोअर स्टेडियम, सत्तरी तालुक्यातील होंडा, केरी आणि नगरगांव मतदारसंघासाठी वाळपईतील वनप्रशिक्षण स्कूलचे सभागृह, बार्देश (1) तालुक्यातील कोलवाळ, हळदोणे, पेन्ह द फ्रान्स, रेईश मागूश आणि सुकूर या मतदारसंघांसाठी पेडे येथील इनडोअर स्टेडियमच्या बॉक्सिंग सभागृहात व्यवस्था करण्यात आली आहे.
बार्देश (2) तालुक्यातील कळंगूट, हणजुणे, शिरसई आणि शिवोली या मतदारसंघांसाठी पेडे येथील इनडोअर स्टेडियमचा बॅडमिंटन सभागृह, पेडणे तालुक्यातील हरमल, मोरजी, धारगळ आणि तोरसे या मतदारसंघांसाठी पेडणेतील संत सोहिरोबानाथ आंबिये महाविद्यालय, डिचोली तालुक्यातील लाटंबार्से, कारापूर सर्वण, मये आणि पाळी या मतदारसंघांसाठी नारायण झांटय़े महाविद्यालयातील जिमखाना सभागृहात व्यवस्था करण्यात आली आहे.
दक्षिण गोव्यात सालसेत (1) तालुक्यातील राय, नुवे, कोलवा, बाणावली व वेळ्ळी या मतदारसंघांसाठी मडगाव येथील माथानी साल्ढाणा प्रकल्पात तळमजला (उत्तर बाजू), सालसेत (2) तालुक्यातील दवर्ली, गिरदोळी, कुडतरी या मतदारसंघांसाठी मडगाव येथील माथानी साल्ढाणा प्रकल्पात तळमजला (दक्षिण बाजू), सांगे तालुक्यातील रिवण मतदारसंघासाठी सांगे सरकारी क्रीडा प्रकल्प, धारबांदोडा तालुक्यातील धारबांदोडा आणि सावर्डे तालुक्यांसाठी तामसडो धारबांदोडा येथील सरकारी प्राथमिक शाळा, केपे तालुक्यातील शेल्डे आणि बार्से तालुक्यांसाठी बोरीमळ केपे येथील क्रीडा प्रकल्पात व्यवस्था करण्यात आली आहे.
काणकोण तालुक्यातील खोला आणि पैंगिण मतदारसंघांसाठी काणकोण येथील सरकारी महाविद्यालय, फोंडा (1) तालुक्यातील उसगांव-गांजे, बेतकी-खांडोळा, कुर्टी, वेलिंग-प्रियोळ तसेच फोंडा (2) तालुक्यातील कवळे, बोरी आणि शिरोडा या मतदारसंघांसाठी फर्मागुडी येथील आयटीआय आणि मुरगाव तालुक्यातील कुठ्ठाळी मतदारसंघासाठी वास्कोतील मुरगाव पोर्ट इन्स्टिटय़ूट येथे मतमोजणीची व्यवस्था करण्यात आली आहे.









