सकाळी 8 वाजल्यापासून होणार प्रारंभ : मतपत्रिका असल्याने विलंबाची शक्यता
प्रतिनिधी / पणजी
राज्यातील 50 पैकी 48 जिल्हापंचायत प्रभागांसाठी दि. 12 डिसेंबर रोजी होणार असलेल्या मतदानानंतर दि. 14 डिसेंबर रोजी होणाऱया मतमोजणीसाठी 15 ठिकाणी मतमोजणी हाती घेण्यात येणार आहे. मतमोजणीला सकाळी 8 वा. प्रारंभ होईल. तिसवाडीमध्ये कांपाल इंडोर स्टेडियममध्ये ताळगाव, सांताप्रुझ, चिंबल, आगशी व खोर्ली मतदारसंघांची मतमोजणी होईल.
सत्तरी तालुक्यातील मतमोजणी वाळपई येथील वन प्रशिक्षण सभागृहात होईल. होंडा, केरी व नगरगाव मतदारसंघांची मतमोजणी क्रमशः हाती घेतली जाईल.
बार्देश तालुक्यात दोन ठिकाणी मतमोजणी होईल. पहिल्या टप्प्यात पेडे येथील इंनडोर स्टेडियमच्या बॉक्सिंग सभागृहात होईल. त्यात कोलवाळ, हळदोणे पेन्ह-द- फ्रान्स, रेईश मागुश व सुकूर या मतदारसंघांची तर याच स्टेडियममधील बॅडमिंटन सभागृहात कळंगूट, हणजुणे, शिरसई व शिवोली मतदारसंघांची मतमोजणी होईल.
पेडणे तालुक्यातील हरमल, मोरजी, धारगळ व तोरसे या मतदारसंघाची मतमोजणी संत सोहिरोबानाथ आंबिये महाविद्यालय, पेडणे येथे होईल.
डिचोली तालुक्यातील लांटबार्से, कारापूर- सर्वण, मये व पाळी या मतदारसंघांची मतमोजणी झांटय़े कॉलेजच्या जिमखाना सभागृहात होईल.
सासष्टीची मतमोजणी जिल्हाधिकारी कार्यालयात
सासष्टी तालुक्याची मतमोजणी दोन ठिकाणी होईल. माथानी साल्ढाणा जिल्हाधिकारी कार्यालय पहिला मजला उत्तर बाजू मडगाव येथे राय, नुवे, कोलवा, बाणावली व वेळ्ळी या मतदारसंघांसाठी तर याच प्रकल्पातील दक्षिण बाजूला दवर्ली, गिरदोली व कुडतरी या मतदारसंघाची मतमोजणी हाती घेण्यात येईल.
सांगेमधील रिवण या एकमेव मतदारसंघांची मतमोजणी सरकारी क्रीडा संकूल सांगे येथे होईल. धारबांदोडय़ातील धारबांदोडा, व सावर्डे या मतदारसंघांची मतमोजणी तामसोडे धारबांदोडा येथील सरकारी प्राथमिक शाळेत होईल. केपे तालुक्यातील शेल्डे व बार्से मतदारसंघांची मतमोजणी बोरीमळ केपे येथील सरकारी क्रीडा संकूलात हाती घेण्यात येईल.
काणकोणच्या खोल व पैगिंणसाठी मतदारसंघांची मतमोजणी सरकारी उच्च माध्यमिक विद्यालय काणकोण येथे मतमोजणी होईल.
फोंडा तालुक्यात दोन ठिकाणी मतमोजणी
फोंडा येथील मतमोजणी दोन केंद्रातून होईल. आयटीआय केंद्र फर्मागुडी येथे पहिल्या केंद्रात उसगाव- गांजे, बेतकी खांडोळा, कुर्टी व वेलिंग प्रियोळसाठी तर दुसऱया केंद्रात कवळे, बोरी, शिरोडा या मतदारसंघांची मतमोजणी होईल.
मुरगाव तालुक्यातील कुठ्ठाळीची मतमोजणी मुरगाव पोर्ट इन्स्टिटय़ूट वास्को येथील सभागृहात होईल.









