प्रतिनिधी / बेळगाव
जिल्हा पंचायत अधिकारी आणि तालुका पंचायत अधिकारी व कर्मचारी यांनी मतदान जनजागृतीसाठी सायकलफेरी काढली. या सायकलफेरीचे उद्घाटन जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा स्वीप समितीचे अध्यक्ष दर्शन एच. व्ही. यांनी ध्वज दाखवून केले.
शहरातून सायकलफेरी काढून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. जिल्हा पंचायत कार्यालयापासून या
रॅलीला सुरुवात झाली. त्यानंतर शहरातील विविध ठिकाणी जनजागृती करण्यात आली. मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावावा, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी, पीडीओ वासुदेव र्किक यांच्यासह जिल्हा पंचायत व तालुका पंचायतमधील अधिकारी, कर्मचाऱयांनी तसेच सायकलपटूंनी या रॅलीमध्ये भाग घेतला होता.









