प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्हय़ात कोरोनापासून बरे होण्याचे प्रमाण वाढताना दिसून येत आह़े शुक्रवारी 88 कोरोनामुक्त रूग्णांना घरी सोडण्यात आल़े यामुळे एकूण बरे होणाऱयांची संख्या 7 हजार 38 झाली आह़े शुक्रवारी 56 नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले असून एका रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शासकीय रूग्णालयाकडून देण्यात आली.
शुक्रवारी आरटीपीसीआर व ऍन्टीजेन चाचण्यांमध्ये एकूण 56 रूग्ण आढळून आल़े यामध्ये रत्नागिरीत 28, कामथे 8, कळंबणी 7, दापोली 4, मंडणगड 1, गुहागरात 4 रूग्ण आढळून आले आहेत़ जिल्हा शासकीय रूग्णालयाकडून एकूण 575 चाचण्या करण्यात आल्या होत्य़ा कोरोना रूग्ण आढळण्याचे प्रमाण तुलनेने कमी झाल्याचे दिसून येत आह़े जिह्यातील एकूण कोरोना रूग्णांची संख्या 7 हजार 929 झाली आह़े
जिल्हा कोविड रूग्णालय येथे 59 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल़ा जिह्यातील कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या आता 291 तर जिह्यातील मृत्यूदर आता 3.6 झाला आह़े सर्वाधिक 79 मृत्यू रत्नागिरी तालुक्यात झाले असून त्यानंतर चिपळूण येथे 69 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आह़े खेड तालुक्यात 48, गुहागर 11, दापोली 31, संगमेश्वर 29, लांजा 10, राजापूर 12 तर मंडणगडमध्ये 2 अशा एकूण 291 जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला.









