सलग 9 व्या दिवशी संप सुरूच
प्रतिनिधी/ रत्नागिरी
राज्यभरात एसटीचा संप मिटण्याची चिन्हे नसताना रत्नागिरी विभागात मात्र 100हून अधिक कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. यामध्ये वर्कशॉप व आस्थापनमधील कर्मचारी असल्याचे सांगण्यात आल़े चालक व वाहक मात्र कामावर हजर झालेले नसल्याने प्रत्यक्षात एसटी बस सुरू करण्यात अडथळे आहेत़ दरम्यान सलग 9 व्या दिवशी सुरु असलेल्या या संपामुळे रत्नागिरी विभागाला सुमारे 5 कोटींचा फटका बसला आह़े
जिह्यात एसटी कर्मचाऱयांच्या संपामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आह़े विविध ठिकाणी प्रवासासाठी खासगी वाहतुकीचा आधार घेतला जात आह़े एसटीचे शासनामध्ये विलिनीकरण करावे, या मागणीसाठी गेल्या 9 दिवसांपासून एसटी कर्मचारी संपावर अडून बसले आहेत़ यामध्ये कोणताही तोडगा निघत नसल्याने प्रवासी मात्र हवालदिल झाले आहेत.
दिवाळी सुट्टीनंतर शाळा व महाविद्यालये सुरू झाली असली तरी बस सुरू नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आह़े याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागाला बसत आह़े या ठिकाणी पर्यायी व्यवस्था नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत़ जिह्यामध्ये एसटीच्या 4 हजार 500 फेऱयांना या संपाचा फटका बसला असून प्रतिदिन सुमारे 70 लाख रूपयांचे नुकसान होत आह़े
एसटी कर्मचारी हळूहळू कामावर हजर
संपाची कोंडी फुटत नसल्याने एसटी कर्मचारी हळूहळू कामावर हजर होत असल्याचे दिसत आह़े एसटीचे अधिकारी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱयांशी सातत्याने चर्चा करत आहेत़ मात्र या संपाला एकमुखी नेतृत्व नसल्याने चर्चा कुणाशी करावयाची, असा प्रश्न अधिकाऱयांपुढे उभा आह़े राज्यस्तरावरूच निर्णय घेतला गेल्यास ही कोंडी फुटण्याची शक्यता वर्तवली जात आह़े









