कोरोना प्रतिबंधासाठी प्रशासनाचे पाऊल
प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येला ब्रेक लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पाऊल उचलले असून मंगळवारपासून रात्री 9 ते सकाळी 5 या वेळेत संचारबंदी लागू केली आहे. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी या बाबतचे निर्देश जारी केले आहेत. पुरवणी निर्देशामध्ये गर्दीची शक्यता व त्याद्वारे कोरोना प्रसार टाळण्यासाठी विविध निर्देश देण्यात आले आहेत.
जिह्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाची दुसरी लाट येत असल्याची परिस्थिती निर्माण झाली असून कोरोनाबाधीतांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दीवर नियंत्रण आवश्यक आहे, याची खात्री झाल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, रत्नागिरी यांनी पुरवणी आदेश निर्गमित केले आहेत. यानुसार जिह्यात लॉकडाऊन कालावधीत रात्री 9.00 ते सकाळी 5.00 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या वेळेत अत्यावश्यक सेवेतील अधिकारी, कर्मचारी, रुग्ण व त्याच्यासोबत नातेवाईक वगळता कोणालाही विनाकारण बाहेर फिरण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. या वेळेत विनाकारण फिरताना आढळणाऱया व्यक्तींच्या विरोधात नियमानुसार कार्यवाही हेणार आहे.
….यासाठी परवानगी आवश्यक
जिह्यामध्ये विविध क्रिडा स्पर्धा, कोणत्याही प्रकारचे सांस्कृतिक, धार्मिक समारंभ ज्यामध्ये 50 च्या मर्यादेपर्यंत लोक एकत्रित येण्याची शक्यता आहे अशा कार्यक्रमांना उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. उद्याने, मोकळय़ा जागा, मनोरंजन पार्क, क्रिडांगणे, समुद्र किनारे अशा ठिकाणी एकाचवेळी 50 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास या आदेशाव्दारे मज्जाव करण्यात आला आहे. जिह्यातील धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे, यात्रा, जत्रा, ऊरुस यांमधील फक्त धार्मिक विधी करण्यास 50 माणसांच्या मर्यादेत परवानगी देण्यात आली आहे. तथापि, या कामी उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांची परवानगी बंधनकारक असून विनापरवाना जत्रा, यात्रा, ऊरुस भरविणेस मनाई करण्यात आली आहे.
मास्क नसल्यास कडक कार्यवाही
जिह्यामध्ये सर्व सार्वजनिक ठिकाणे, सर्व आस्थापना, सर्व समारंभ, कार्यक्रमाच्या ठिकाणी मास्क बंधनकारक असून केवळ मास्क जवळ बाळगून त्याचा वापर न करणे किंवा योग्य रितीने वापर न करणे ही बाब मास्कचा वापर न करणे समजण्यात येणार आहे. मास्क न वापरणाऱया व्यक्तीवर 500 रुपये दंड आणि प्रचलित नियमाप्रमाणे कारवाई हेणार आहे. यासाठी स्थानिक प्रशासन व पोलीस प्रशासनाला सक्षम प्राधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात आले आहे. हे सर्व आदेश संपूर्ण रत्नागिरी जिल्हय़ात 22 फेब्रुवारी मध्यरात्री 12 वा. पासून पुढील आदेशापर्यंत अंमलात राहणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.
जिह्यात 13 नवे रुग्ण, 2 मृत्यू
मंगळवारी जिह्यामध्ये कोरोनामुळे रत्नागिरी तालुक्यातील 69 वर्षीय महिलेचा तर खेडमधील 48 वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला आहे. मागील 24 नव्याने 13 कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल़े यामध्ये रत्नागिरी 4, दापोली 2, खेड 1, चिपळूण 3 व संगमेश्वर तालुक्यातील 3 रूग्ण आहेत. यामुळे जिह्यातील कोरोना रूग्णांची संख्या 9 हजार 883 झाली आह़े मंगळवारी 28 रूग्णांना घरी सोडण्यात आल्याने बरे झालेल्यांची संख्या 9 हजार 356 व प्रमाण 94.66 टक्के झाले आह़े जिह्याचा मृत्यूदर 3.68 पर्यंत पोहोचला आहे.़
एकूण रूग्ण-9883
नवे रूग्ण -13
नवे मृत्यू -02
एकूण मृत्यू -364









