प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी जिह्यात तब्बल 590 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत़ तर शुक्रवारी 16 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आह़े रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ड़ॉ इंदुराणी जाखड यांचा कोरोना रिपोर्ट पॉ†िझटिव्ह आला आह़े दोन दिवसांपूर्वी ज़ि प अध्यक्ष विक्रांत जाधव यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले होत़े यानंतर जाखड यांनी स्वतःचे विलगीकरण केले होत़े दरम्यान जिह्याचे पोलीस अधीक्षक ड़ॉ मोहितकुमार गर्ग हे जाखड यांचे पती असल्याने त्यांनी सुद्धा स्वतःचे विलगीकरण केले आह़े
ड़ॉ जाखड यांनी कोरोनाविरोधी लसींचे दोन्ही डोस घेतले आहेत़ तसेच त्यांना कोणत्याही प्रकारची लक्षणे नसल्याचे सांगण्यात आले आह़े आता ड़ॉ जाखड यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी असे आदेश देण्यात आले आहेत़ तसेच स्वतःचे विलगीकरण करुन घ्यावे असेही सांगण्यात आले आह़े
यामध्ये रत्नागिरी तालुक्यात 12, संगमेश्वरमध्ये 2 तर चिपळूण तालुक्यात 2 जणंचा मृत्यू झाला आह़े जिह्यातील एकूण कोरोनामुळे होणाऱया मृत्यूची संख्या आता 1 हजार 306 इतकी झाली आह़े तसेच 329 कोरोनापासून बरे झालेल्यांना घरी सोडण्यात आले आह़े जिह्याचा पॉ†िझटिव्हीटी रेट 17.83 असून मृत्यूदर 3.34 इतका आह़े
अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या उपचारात दिरंगाई
रत्नागिरी शहरात कोरोना चाचणी केल्यानंतर अहवाल पॉ†िझटिव्ह असलेल्या रुग्णांच्या उपचारात दिरंगाई होत असल्याचे समोर आले आह़े शुक्रवारी शहरातील एका शाळेमध्ये सकाळी ऍन्टिजेन टेस्ट पॉ†िझटिव्ह आलेल्या रुग्णांना सायंकाळी 5 वाजता उपचारासाठी दाखल करण्यात आल़े दरम्यान रुग्णांना नेणारी रुग्णवाहिका नसल्याचे कारण सांगण्यात आले आह़े मात्र यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणा कोरोना बाधितांच्या प्रती गंभीर नसल्याचा अनुभव रुग्णांना येत आह़े
अलगीकरण कक्षासाठी 170 शाळा ताब्यात
कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिह्यातील गावांमध्ये अलगीकरण कक्ष सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आह़े यासाठी रत्नागिरी तालुक्यातील माध्यमिक व प्राथमिक अशा 170 शाळा ग्राम कृती दलाच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत़ अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आह़े









