प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यात रविवारी करोनाचे 38 नवे रूग्ण आढळून आले आहेत़ समाधानाची बाब म्हणजे गेल्या काही दिवसांपासून कारानाच्या रूग्णांमध्ये घट होत असल्याचे दिसून येत आह़े त्यामुळे काराना बाधित रूग्णांच्या वाढीचा वेग मंदावला असल्याचे बोलले जात आह़े दरम्यान रविवारी 3 कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल़ा मृतांची एकूण संख्या 273 इतकी झाली आह़े
रविवारी 118 नमुन्यांपैकी 38 रूग्णांचे अहवाल कारोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आह़े यामुळे जिह्यातील एकूण कारानाबाधितांची संख्या आता 7 हजार 669 इतकी झाली आह़े तर रविवारी दापोली येथील 55 वर्षीय, रत्नागिरी 57 व राजापूर येथील 90 वर्षीय पुरूष रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल़ा तर 62 बरे झालेल्या रूग्णांना रूग्णालातून घरी सोडण्यात आल़े एकूण बरे झालेल्याची संख्या 6 हजार 600 इतकी झाली आह़े
जिल्हा शासकीय रूग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी आरटीपीसीआर मध्ये 14 व ऍन्टीजेन टेस्टमध्ये 24 असे एकूण 38 करोनाचे रूग्ण आढळून आल़े यामध्ये रत्नागिरीत 18, खेड 04, गुहागर 05, चिपळूण 11, कोरोनाचे रूग्ण मिळून आले आह़े मृतांच्या तालुकानियाह आकडेवारीचा विचार करता रत्नागिरी सर्वाधिक 75, खेड 45, गुहागर 10, दापोली 30, चिपळूण 67, संगमेश्वर 24, लांजा 09, राजापूर 11 तर मंडणगडमध्ये 02 असे एकूण 273 जणांचा आतापर्यंत कारोनामुळे मृत्ये झाला आह़े









