प्रतिनिधी/रत्नागिरी
जिह्यामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचे दिसत आह़े जिह्यात शनिवारी 388 नव्या रुग्णांची नेंद करण्यात आली आह़े तर 16 जणांचा मृत्यू झाला. तसेच चाचण्यांची संख्याही वाढवण्यात आल्याने पॉ†िझटिव्हीटी दर 4.65 पर्यंत खाली आला आह़े तर मृत्यूदर 3.42 टक्के असल्याचे नोंदवण्यात आले.
जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिह्यात शनिवारी 5 हजार 395 कोरोना चाचण्या करण्यात आल्य़ा यामध्ये आरटीपीसीआर टेस्टमध्ये 65 तर ऍन्टिजेन चाचणीत 186 तर मागील 137 असे 388 कोरोनाबाधित रुग्ण मिळून आल़े तर मागील 24 तासांमध्ये 16 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आह़े जिह्यातील एकूण बाधितांची संख्या आता 44 हजार 451 इतकी झाली आह़े तर मृतांची संख्या आता 1 हजार 623 इतकी झाली आह़े तर रत्नागिरी जिह्याचा मृत्यूदर 3.42 इतका आह़े









