प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यातील कारोनाबाधित मृतांचा आकडा पन्नाशीच्या पुढे गेला आह़े रविवारी रत्नागिरीमधील 2 तर राजापूरमधील 1 एक अशा 3 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल़ा जिह्यातील मृतांचा एकूण आकडा 52 इतका झाला आह़े तर मागील 24 तासात 37 नव्या रूग्णांची भर पडली आह़े यामुळे जिह्यातील कोरोनाबाधित रूग्णांची एकूण संख्या 1 हजार 557 इतकी झाली आह़े
नव्याने आढळून आलेल्या 37 रूग्णांमध्ये कामथे येथे सर्वाधिक 20 रूग्ण, रत्नागिरी 4, दापोली 11 व गुहागर येथे 2 रूग्ण आढळून आले आहेत़ समाधानाची बाब म्हणजे रविवारी 34 कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांना घरी सोडण्यात आल़े यामध्ये कोवीड रूग्णालय रत्नागिरीमधून 8, कोवीड सेंटर वेळणेश्वर येथून 7, समाजकल्याण सेंटर येथून 11 तर घरडा खेडमधून 8 रूग्णांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आल़े यामुळे उपचारात असलेल्या रूग्णांची संख्या 518 इतही राहिली आह़े
जिह्यात कोरोनामुळे वाढत जाणारा मृतांचा आकडा चिंतेचा विषय ठरला आह़े जिल्हा रूग्णालयाकडून एकूण 16 हजार 82 नमुने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 15 हजार 558 अहवाल प्राप्त झाले आहेत़ त्यामधील 13 हजार 990 अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत़ जिह्यामध्ये सध्या 148 ऍक्टिव्ह कन्टेंन्मेट झोन तयार करण्यात आले आहेत़ रत्नागिरी तालुक्यात 26, दापोलीत 2, खेडमध्ये 35, चिपळूण तालुक्यात 65 मंडणगडमध्ये 3, गुहागरमध्ये 8, लांजा 6, राजापूरमध्ये 3 ठिकाणी कन्टेमेंट झोन तयार करण्यात आले आहेत़
जिह्यामध्ये एकूण 100 संशयित रूग्ण संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले आहेत़ यामध्ये जिल्हा शासकीय रूग्णालयात 59, समाजकल्याण भवन येथे 1, उपजिल्हा रूग्णालय कामथेत 18, कोव्हीड सेंटर पेढांबेत 2, कळंबणीत 3, दापोलीत 15, घरडा व लांजा येथे प्रत्येकी 1 संशयित रूग्ण संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आला आह़े
कोरोनाची जिल्हय़ातील स्थिती:
एकूण रूग्ण -1557
बरे झाले -987
मृत्यू- 52
उपचारात -518
कोरोना टेस्टींग लॅबमधील डॉक्टरच पॉझिटीव्ह

दिवसेंदिवस जिल्हय़ातील कोरोनाबाधितांची संख्या दुप्पटीने वाढत असून आता कोरोना योध्दा म्हणून काम करणाऱयांनाच कोरोनाची बाधा होवू लागली आहे. अगदी जोखीममध्ये केवळ रूग्णांसाठी काम करणाऱया सिव्हीलमधील 2 डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली असताना आता कोरोना टेस्टींग लॅबमधील एका डॉक्टरांनाच कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
भूलतज्ञ, बालरोग तज्ञांनंतर आता स्वॅब चाचणी रिपोर्ट काढणारे एक वैद्यकीय अधिकारी पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. नेमका संसर्ग कसा झाला, हे स्पष्ट नसले तरी कोरोना योध्दा म्हणून काम करणाऱया अधिकाऱयांना कोरोनाची लागण होवू लागल्याने चिंतेची बाब बनली आहे. हॉस्पीटलमध्ये येणाऱया नातेवाईकांना वारंवार सहकार्याचे आवाहन करूनही वैद्यकीय अधिकाऱयांना सहकार्य मिळत नाही. गेले 4-5 महिने आरोग्य विभागातील सर्व परिचारिका, कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी जोखीममध्ये कामगिरी बजावत असताना या सर्वांना नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. तरीही शासकीय रूग्णालयातील सर्व स्टाफ न खचता आपली डय़ुटी प्रामाणिकपणे पार पाडत आहेत.









