प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यामध्ये कोरोनाबाधित मृत्यूची संख्या चिंता वाढवणारी आह़े रविवारी आणखी 17 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले. यामुळे जिह्यातील एकूण मृतांचा आकडा 1 हजार 76 इतका झाला आह़े तर नव्याने जिह्यात 402 रूग्ण आढळून आल़े रूग्णांची संख्या स्थिरावलेली दिसून येत असली तरी अद्याप घट दिसून आलेली नाह़ी त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आह़े
शनिवारी जिल्हा रूग्णालयाकडून करण्यात आलेल्या 1 हजार 957 टेस्टपैकी आरटीपीसीआर टेस्टमध्ये 189 तर ऍन्टीजेन टेस्टमध्ये 213 असे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आल़े तर 17 मृत्यूची नोंद करण्यात आली आह़े जिल्हा शासकीय रूग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 17 मृतांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील 7, चिपळूण 5, लांजा 1, मंडणगड 1, दापोली 1, गुहागर 2 रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल़ा एकूण मृतांची संख्या 1 हजार 76 झाली आह़े
तालुकानिहाय मृतांच्या संख्येनुसार, रत्नागिरी 304, खेड 113, गुहागर 58, दापोली 97, चिपळूण 213, संगमेश्वर 145, लांजा 58, राजापूर 76, मंडणगड 12 मृत्यू झाले आहेत़ तर रत्नागिरी जिह्यात मागील 24 तासांत 402 नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत़ जिह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 32 हजार 846 पर्यंत पोहोचली आह़े
एकूण रूग्ण -32846
नवे रूग्ण -402
एकूण मृत्यू -1076
मृत्यू – 17









