चाचण्या घटल्याने रूग्णसंख्येत घट, 2 जणांचा मृत्यू
प्रतिनिधी/रत्नागिरी
जिह्यामध्ये बुधवारी कोरोनाचे नव्याने 71 रूग्ण आढळून आल़े तर 2 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आह़े मागील काही दिवसांपासून कोरोना चाचण्यांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. बुधवारी केवळ 2 हजार 896 चाचण्या करण्यात आल्या. कमी चाचण्यांमुळे कोरोना रूग्णसंख्या कमी दिसून येत आहे. यामुळे पुढील काळात पुन्हा एकदा कोरोनाचे संकट उभे राहण्याची शक्यता वर्तवली जात आह़े
जिह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 75 हजार 214 इतकी झाली आह़े आरटीपीसीआर टेस्टचा विचार करता जिह्याचा पॉ†िझटिव्हीटी रेट 3.01 इतका आह़े उपचारात असलेल्या 2 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आह़े तसेच यापूर्वीचा 1 मृत्यू आहे. यामध्ये गुहागर-1, चिपळूण-1, खेड-1 अशी तालुकानिहाय आकडेवारी आह़े तर मागील 24 तासात बरे झालेल्या 103 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आल़े एकूण बरे झालेल्यांची संख्या 71 हजार 844 इतकी झाली आह़े बरे होण्याचे प्रमाण 95.52 इतके आह़े तर 1 हजार 12 रूग्ण उपचारात दाखल करण्यात आले आहेत़ यामध्ये केवळ 296 रूग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येत आहेत़









