प्रतिनिधी/रत्नागिरी :
जिह्यात कारोना बाधितांच्या संख्येने 500 चा टप्पा ओलांडला आहे. बुधवारी रात्रीपासूनच्या 24 तासात 12 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यात रत्नागिरी शहरातील एका हॉस्पीटलमधील नर्सचाही समावेश आहे. चाकरमान्यांबरोबरच आता स्थानिकामध्ये कोरानाची लागण होत असल्याने रत्नागिरीकरांची चिंता वाढली आह़े बुधवार सायंकाळपासून 13 जण कोरोनामुक्त झाले असून बरे झालेल्यांची संख्या 377 झाली आहे.
गुरूवारी नव्याने आढळून आलेल्या 12 रूग्णांमध्ये लांजा, संगमेश्वर, दापोलीत प्रत्येकी 3, रत्नागिरीत 2 तर चिपळुणातील एकाचा समावेश आहे. लांजात इसवलीमध्ये तर खावदरवाडीमध्ये 1, रत्नागिरीत खेडशीनाका, उद्यमनगरमध्ये प्रत्येकी 1, दापोलीत आडे, विसापूरमध्ये प्रत्येकी 1, संगमेश्वरमध्ये अनधेरीत 1 तर संगमेश्वरमध्ये दोन मधील 1 तर चिपळूणमध्ये फुरूस कदमवाडी येथील एकाचा अहवाल कोरोना पॉझीटीव्ह आला आहे. यामुळे जिह्यातील कारोना बाधितांची संख्या 511 वर पोहचली आह़े
13 जण कोरोनामुक्त
बुधवार सायंकाळपासून कोव्हीड केअर सेंटर पेढांबे, चिपळूण येथून 9 तर कोव्हीड केअर सेंटर समाजकल्याण रत्नागिरी येथून 3 व संगमेश्वर येथून 1 अशा 13 रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. त्यामुळे कोरोनामुक्तांची संख्या 377 झाली असून बरे होणाऱया रुग्णांची प्रमाण 73 टक्के आहे. आजपर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला असून उपचाराखालील रुग्णांची संख्या 110 आहे.
171 अहवाल प्रलंबीत
जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 8 हजार 660 नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 511 अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. 7 हजार 954 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अद्याप 171 नमुन्यांचा अहवाल प्रलंबीत असून त्यात मिरजमधील 18 तर रत्नागिरीतील 153 अहवालांचा समावेश आहे.
चिपळूण-फुरूस मधील वृध्द पॉझीटीव्ह
चिपळूण : तालुक्यातील फुरूस-कदमवाडी येथील 69 वर्षीय वृध्दाला कोरोनाची लागण झाल्याचे गुरूवारी स्पष्ट झाले आहे. त्याच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असून कदमवाडी आयसोलेट करण्यात आली आहे. नव्या रूग्णामुळे तालुक्यातील बाधीतांची संख्या 81 झाली आहे. यातील 5 जणांचा मृत्यू झाला असून 73 जण बरे होऊन घरी परतले आहेत. फुरूस-कदमवाडी येथील वृध्द 8 जून रोजी मुंबईतून गावी आला आहे. त्याला दोन दिवसांपूर्वी ताप आल्याने नमुने घेण्यात आले होते. त्याच्या घरातील 12 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत.
लांजा शहरात कोरोनाचा शिरकाव
लांजाः खावडकरवाडी येथे कोरोनाचा नवा रूग्ण आढळून आल्याने शहरात कोरोनाने प्रवेश केला आहे. संबंधीत 62 वर्षीय रुग्ण आपल्या मुलासोबत 17 रोजी मुंबईतून आले होते. विलीगिकरण शिक्के मारून खावडकरवाडी येथील एका चाळीतील खोलीत ते राहत होते. ज्योषीष व्यवसाय करणाऱया ही व्यक्ती मूळ देवगड तालुक्यातील आहे. काही दिवसांपुर्वी ताप आल्याने तपासणीस देवधे केंद्रात गेले असता प्राथमिक तपासणी करून घरी पाठवले होते. त्यानंतर प्रकृती बिंघडल्याने रिक्षा करून रत्नागिरीत दाखल झाले. तेथे स्वॅब अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. खावडकर प्रभाग हा कंन्टेन्मेंन्ट झोन जाहीर करून सील करण्यात आला आहे. दरम्यान, लांजा शहरातील रिक्षावाला, रूग्णाचा मुलगा आणि खोलीजवळील रहिवासी याचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात येणार आहेत.









