प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यामध्ये रविवारी एसटीच्या 160 हून अधिक फेऱया सोडण्यात रत्नागिरी विभागाला यश आल़े एसटीचे चालक व वाहक मोठय़ा संख्येने कामावर हजर होत असल्याचे दिसून येत आह़े तब्बल 135 चालक वाहक कामावर हजर झाल्याचे एसटीकडून सांगण्यात आले आह़े फेऱयांची सख्या वाढवण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आह़े
रविवारी पुन्हा एकदा मंडणगड येथून बस फेऱया सोडण्यात आल्य़ा त्याचप्रमाणे एकूण 526 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत़ चालक वाहकांचा विचार करता 60 चालक तर 45 वाहक व 19 चालक-वाहक कामावर हजर होत़े दरम्यान एसटीचे शासनामध्ये विलीनीकरण करावे यासाठी संप सुरू असतानाच जिह्यात रविवारी 150 हून अधिक फेऱया सुरू करण्यात प्रशासनाला यश आल़े वाहतूकीला जिह्यात प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आह़े
राज्यभर कर्मचारी संपावर ठाम असताना रत्नागिरीत कर्मचारी कामावर हजर राहण्यास सुरूवात झाली आह़े रविवारी एकूण 3 हजार 779 कर्मचाऱयांपैकी 526 कर्मचारी हजर राहिल़े यामध्ये प्रशासकीय मधील 185, कार्यशाळेतील 165, चालक 60, वाहक 45, चालक वाहक 19 अशा प्रकारे कर्मचारी कामावर हजर राहिले आहेत़ तर 52 कर्मचारी हे अधिकृत रजेवर असल्याचे सांगण्यात येत आह़े









