सर्वाधिक हुक्केरी-बेळगाव तालुक्मयात कामे, कागवाडमध्ये सर्वात कमी कामगारांना काम
प्रतिनिधी/ बेळगाव
पावसामुळे जिह्यातील उद्योग खात्रीतील कामांना काही अंशी स्थगिती देण्यात आली होती. मात्र आता पुन्हा या कामांना चालना देण्यात आली असून जिह्यातील सर्वच तालुक्मयांमध्ये ही कामे सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे यापुढे उद्योग खात्रीतील कामगारांना काम मिळणार आहे. बेळगाव तालुक्यासह जिह्यात आता मोठय़ा प्रमाणात काम उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. बेळगाव जिह्यात आता दररोज 60 हजारांच्या आसपास कामगारांना काम देण्यात येत आहे. त्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहेत. सर्वाधिक बेळगाव व हुक्केरी तालुक्मयातील कामगारांना काम मिळत असून सर्वात कमी कागवाड तालुक्मयातील कामगारांना काम मिळत आहे.
बेळगाव जिह्यात उद्योग खात्रीतून विविध विकास कामांना चालना देण्यात आली आहे. त्यामुळे दररोज साधारणतः 60 हजार कामगारांना काम देण्यात येत आहे. जिह्यातील प्रत्येक तालुक्मयातील विविध गावांत उद्योग खात्री योजनेच्या कामांना चालना देण्यात आली आहे. गावात काम नसले तरी वनविभागाच्या माध्यमातून रोजगारांना कामे देण्यात येत आहेत. त्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे. याचा विचार करून आता सध्या जिह्यात 60 ते 65 हजार कामगारांना कामे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ही संख्या आता 70 हजारांवर जाण्याची शक्मयता आहे. त्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.
बेळगाव जिल्हा हा उद्योग खात्रीतून कामे देण्यासाठी राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात कामे देऊन विकास साधण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. यावषी पुरामुळे प्रत्येक गावात मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे याची काळजी घेऊन गावागावात उद्योग खात्रीतून कामे देण्यावर भर देण्यात येत आहे. याचबरोबर सध्या पावसामुळेही काही प्रमाणात कामे बंद ठेवण्यात आली होती. तर जिह्यात कमी पाऊस असलेल्या ठिकाणी ही कामे देण्यात आली. मात्र अजूनही पावसामुळे कामांना गती देण्यात येत नसल्याचे सांगण्यात येत आहे.
सध्या या कामांना सुरुवात झाल्याने अनेकांतून समाधान व्यक्त करण्यात येत असून कामांची गती वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. बेळगाव तालुक्मयात उद्योग खात्रीची कामे मोठय़ा प्रमाणात चालतात. एका बेळगाव तालुक्मयात साधारणतः 8 ते 10 हजार कामगारांना काम देण्यात येते. मध्यंतरी कामगारांना काम कधी मिळणार याकडेच अनेकांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. मात्र आता कामांना चालना देण्यात आली असून मोठय़ा प्रमाणात कामे सुरू झाली आहेत. बेळगाव तालुक्मयात 9 हजार कामगारांना काम देण्यात येत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. याचबरोबर इतर तालुक्मयांमध्येही मोठय़ा प्रमाणात कामे करण्यात येत आहेत.









