प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरीत जिह्यात कोरोनाचा कहर पहावयास मिळत असला तरी आतापर्यंत 4 टक्के लोकांना कोरोनाची बाधा झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आह़े 17 लाख लोकसंख्या असलेल्या जिह्यात आतापर्यंत 65 हजार 850 जणांना कोरोनाची बाधा झाली आह़े यामधील 58 हजार 906 रूग्ण बरे झाले आहेत तर 1 हजार 860 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल़ा
जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी जिह्यात 5 हजार 373 कोरोना चाचण्या करण्यात आल्य़ा यामध्ये आरटीपीसीआर टेस्टमध्ये 198 तर ऍन्टीजेन चाचणीत 203 तर असे 401 कोरोनाबाधित रूग्ण मिळून आल़े जिह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 65 हजार 850 इतकी झाली आह़े आरटीपीसीआर टेस्टचा विचार करत जिह्याचा पॉ†िझटिव्हीटी रेट 12.36 इतका आह़े तर सामान्य पॉ†िझटीव्हिटी रेट 7.46 असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मागील 24 तासांमध्ये 23 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आह़े मृतांमध्ये चिपळूण-1, खेड-1, लांजा-5, राजापूर-5, रत्नागिरी-9, संगमेश्वर-1, गुहागर-1 अशी मृत्यूची नोंद करण्यात आली आह़े जिह्यातील एकूण मृतांची संख्या आता 1 हजार 860 इतकी झाली आह़े तर रत्नागिरी जिह्याचा मृत्यूदर हा 2.82 इतका आह़े तर शुक्रवारी 1 हजार 35 बरे झालेल्या रूग्णांना घरी सोडण्यात आल़े तर उपचारात 4 हजार 393 रूग्ण असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.









