नव्याने 533 रूग्णांची नोंद
प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यात कोरोनामुळे उपचारात असलेल्या आणखी 33 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आह़े यात 8 शासकीय रूग्णालयात तर 25 जणांचा मृत्यू खासगी रूग्णालयात झाला. यामुळे जिह्यातील एकूण मृतांची संख्या आता 1 हजार 607 इतकी झाली आह़े तर शुक्रवारी जिह्यामध्ये 533 नवे कोरोनाचे रूग्ण आढळून आले आहेत़ वाढत जाणारी रूग्णांची व मृतांची संख्या जिल्हावासियांच्या चिंतेत भर घालत आह़े
जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी जिह्यात 5 हजार 68 कोरोना चाचण्या करण्यात आल्य़ा यामध्ये आरटीपीसीआर टेस्टमध्ये 235 तर ऍन्टीजेन चाचणीत 205 तर मागील 93 असे 533 कोरोनाबाधित रूग्ण मिळून आल़े तर मागील 24 तासांमध्ये 33 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आह़े जिह्यातील एकूण मृतांची संख्या आता 1 हजार 607 इतकी झाली आह़े तर जिह्याचा मृत्यूदर हा 3.41 इतका आह़े मृतांच्या तालुकानिहाय आकडेवारीनुसार, रत्नागिरी 481, खेड 157, गुहागर 138, दापोली 128, चिपळूण 306, संगमेश्वर 186, लांजा 84, राजापूर 114 व मंडणगड 13 अशी आह़े









