प्रतिनिधी/ सातारा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्या गावांमध्ये कोरोनाची परिस्थिती नाही त्या गावात शाळा सुरु करता येतील की नाही या अनुषंगाने शासनाने माहिती मागवली होती. ती माहिती शिक्षण विभागाने गोळा करुन शासनाकडे नुकतीच सादर केलेली आहे. त्यानुसार सातारा जिह्यातील 3833 शाळांपैकी जिल्हा परिषदेच्या 1821 शाळा व खाजगी 621 अशा 2442 शाळा सुरु करता येणार आहेत तर 870 जिल्हा परिषदेच्या आणि 521 खाजगी अशा 1391 शाळा सुरु करता येणार नाहीत अस अहवाल नुकताच राज्य शासनाकडे सादर करण्यात आल्याची माहिती प्राथमिकचे शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे यांनी दिली.
शाळा सुरु कोणत्या करता येतील आणि कोणत्या करता येणार नाहीत, त्या अनुषंगाने राज्य शासनाच्या आदेशानुसार शालेय व्यवस्थापन समितीकडून अहवाल मागवण्यात आला होता. त्यानुसार वाई तालुक्यातील 252 शाळांपैकी 127 जिल्हा परिषदेच्या शाळा व 72 खाजगी व नगरपालिकेच्या शाळा, अशा 199 शाळा सुरु करता येणार आहेत. तर 36 जिल्हा परिषदेच्या व 17 खाजगी अशा 53 शाळा सुरु करता येणार नाहीत. खटाव तालुक्यातील 344 शाळांपैकी 202 शाळा सुरु करता येतील तर 142 शाळा सुरु करता येणार नाहीत. माण तालुक्यातील 354 शाळांपैकी शाळा सुरु 69 जिल्हा परिषदेच्या व 32 खासगी अशा 101 शाळा सुरु करता येणार नाहीत. कराड तालुक्यात527 शाळापैकी 402 शाळा सुरू तर 125 शाळा सुरू करता येणार नाहीत. फलटण 398 शाळांपैकी 69 शाळा सुरू तर 329 शाळा सुरू नाहीत. खंडाळा 170 शाळांपैकी 114 शाळा सुरू तर 56 शाळा सुरू करता येणार नाहीत. जावली 244 शाळा पैकी 218 शाळा सुरू तर 26 शाळा सुरू करता येणार नाहीत. कोरेगाव 268 शाळांपैकी 156 शाळा सुरू तर 112 शाळा सुरू करता येणार नाहीत. पाटण 613 शाळांपैकी 439 शाळा सुरू तर 174 शाळा सुरू करता येणार नाहीत. महाबळेश्वर 179 शाळांपैकी सुरु तर 6 शाळा सुरू करता येणार नाहीत. सातारा 484 शाळांपैकी 217 शाळा सुरू 267 शाळा सुरू करता येणार नाहीत. अशा जिह्यातील 3833 शाळांपैकी जिल्हा परिषदेच्या 1821 शाळा व खाजगी आणि नगरपालिका 621 अशा 2442 शाळा सुरू करता येणार आहेत.








