प्रतिनिधी / रत्नागिरी
राज्यातील कारानाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने पोलीस यंत्रणा देखील सतर्क झाली आह़े कोरोनाच्या प्रार्दुभावाला पोलीस कर्मचारी बळी पडू नयेत यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग हे जिह्यातील पोलीस कर्मचाऱयांच्या आरोग्याचा आढावा घेणार आहेत़ अशी माहिती अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आली आह़े
शाळा, महाविद्यालये सुरू करण्यात येणार असल्याने शिक्षकांना कारोना चाचणी बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आह़े याच पार्श्वभूमीवर पोलीस कर्मचाऱयांच्या कोराना चाचण्यां करण्याबाबत देखील विचार करण्यात येत होत़ा दरम्यान पोलीस कर्मचारी यांना असणाऱया विविध व्याधी, आजार यांचा सविस्तर आढावा घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आह़े
रत्नागिरी जिह्याचा विचार करता बंदोबस्तासाठी असणाऱया अनेक कर्मचाऱयांना कारानाची लागण झाली होत़ी त्यासाठी पोलिसांसाठी स्वतंत्र रूग्णालय देखील तात्कालीन पोलीस अधीक्षक ड़ॉ प्रवीण मुंढे यांनी केले होत़े मात्र तरीदेखील पोलिसांची सुरक्षितता महत्वाची असल्याने सतर्कता बाळगण्यात येत आह़े









