प्रतिनिधी/ सातारा
सातारा तालुक्यातील जिहे गाव जिह्यातील एक नंबर हॉट स्पॉट ठरत आहे.दररोज कोरोना बाधित आढळून येत आहेत. आतापर्यंत 81 जण बाधित आढळून आले आहेत.ही साखळी तोडण्यासाठी सातारा तालुका पोलिसांनी गावावर आता ड्रोन कॅमेरा तैनात केला आहे.
पोलिसांनी जिहे ग्रामस्थांना आवाहान
आपण ड्रोन कॅमेराच्या निगराणी खाली आहात .आपण विनाकारण घराच्या बाहेर पडू नये मास्कचा वापर करावा .आपन जर नियामानचे पालन केले नाहीध तर आपल्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. ड्रोन कॅमेराद्वारे आपल्या गावचे चित्रीकरण अचानक कोणत्याही वेळी करण्यात येणार असल्याने जो कोणी गावात फिरताना आढळून येतील त्याच्यावर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. असे आवाहन सातारा पोलिसांनी केले आहे.








