ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
काश्मीर खोऱ्यात आयुष्यभर जिहादी दहशतवादी गटांचे समर्थन करणारे सय्यद अली शाह गिलानी यांना पाकिस्तानातील सर्वोच्च मानला जाणारा’निशान-ए-पाकिस्तान’ पुरस्कार जाहीर झाला आहे.
गिलानी हे हुर्रियत कॉन्फरन्सचे जेष्ठ नेते आहेत. त्यांनी नेहमीच हिंदुस्थानविरोधी भूमिका घेत फुटीतारवादाचे समर्थन केले आहे. त्यामुळे इम्रान खान सरकारने गिलानींचा गौरव करण्याचे ठरवले आहे. तसेच गिलानी यांच्या नावाने एक महाविद्यालय उभारण्याचा पाक सरकारचा मानस आहे.
गिलानी यांनी नुकताच हुर्रियत या काश्मीर फुटीरतावादी संघटनेचा राजीनामा दिला होता. काश्मीरमधील दहशतवाद आणि हिंसाचाराच्या परिस्थितीला जबाबदार म्हणून गिलानी यांचे नाव घेतले जाते. 2016 मध्ये झालेल्या काश्मीर हिंसाचारानंतर गिलानी यांच्यावर दहशतवादी निधीचाही आरोप ठेवण्यात आला होता. याशिवाय गिलानी यांना काश्मीरमधील त्यांच्या घरीही अनेक वर्षांपासून नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.









