बेळगाव : जिव्हाळा फौंडेशनवतीने शिक्षक दिनाचे आयोजन केले होते. अतिथी म्हणून जि. पं. कार्यकारी अभियंता महांतेश हिरेमठ तर अध्यक्षस्थानी फौंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुरेखा पोटे होत्या.
मान्यवर व शिक्षकांनी दीपप्रज्वलन केले. शिक्षकांचा सत्कार केलेल्यांमध्ये भरतेश हायस्कूलच्या ज्योती मिरजकर व योगिता पाटील, मिलिटरी स्कूलच्या आरती निपाणीकर, शिबा पाटील, हिंडलगा हायस्कूलच्या गीतांजली रेडेकर, कॅन्टोन्मेंट स्कूलचे प्रशांत बिर्जे, मजगाव पदवीपूर्व महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. मधुरा गुरव-मोटराचे यांचा समावेश होता. कार्यक्रमाला सुहास हुद्दार, शेखर पाटील, अमित पाटील, संतोष तलपतूर, श्रीनिवास गुडमट्टी, डॉ. रविंद्र अनगोळ, डॉ. अनिल पोटे, डॉ. केतकी पावसकर, वृषभ अवलक्की, डॉ. मरियम तेबला, संजीवनी पाटील उपस्थित होत्या.









