तीन वर्षांत जागा खरेदीसाठी 26 कोटी रुपयांचा निधी खर्च : आमदार महांतेश कवटगीमठ यांच्या प्रश्नाला सरकारचे उत्तर
प्रतिनिधी / चिकोडी
राज्यात भौगोलिकदृष्टय़ा सर्वाधिक मोठा असलेल्या बेळगाव जिल्हय़ाची अनेक क्षेत्रांमध्ये पिछेहाट होत आहे. हे आता लपविण्यासारखे राहिलेले नाही. बेळगाव जिल्हय़ात 816 गावांमध्ये स्मशानभूमी उपलब्ध आहे. तर अद्याप 372 गावांना स्मशानभूमीची प्रतीक्षा आहे. गेल्या तीन वर्षांत स्मशानभूमीसाठी जागा खरेदी करण्यासाठी 26 कोटी रुपयांचा निधी खर्च केल्याची माहिती महसूलमंत्री आर. आशोक यांनी दिली.
विधान परिषदेतील सरकारचे मुख्य प्रतोद महांतेश कवटगीमठ यांनी अधिवेशन काळामध्ये याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. राज्यातील ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीची आवश्यकता असून कमतरता असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले आहे काय?, तसे असल्यास अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत करण्यात आलेल्या उपाययोजना कोणत्या व बेळगाव जिल्हय़ातील किती गावांमध्ये स्मशानभूमी आहेत व स्मशानभूमीची कमतरता आहे, याबाबत त्यांनी माहिती विचारली होती. त्याला महसूल मंत्री आर. अशोक यांनी लिखित स्वरुपात उत्तर दिले असून राज्यात प्रत्येक गावात सार्वजनिक स्मशानभूमी उपलब्ध करून देण्यासाठी सरकारी जमीन नसल्यास कर्नाटक भू-महसूल अधिनियम 1964 कलम 71 अन्वये जमीन आरक्षित करण्याचा जिल्हाधिकाऱयांना अधिकार आहे. 11 सप्टेंबर 2014 च्या आदेशानुसार सरकारी जमीन असल्यास स्मशानभूमीसाठी किमान दोन एकर जमीन राखीव ठेवण्याचा जिल्हाधिकाऱयांना अधिकार आहे.
स्मशानभूमीसाठी सरकारी जमीन उपलब्ध नसल्यास आवश्यक पडल्यास खासगी जमीन खरेदी करण्यासाठी सरकारने आदेश बजावला आहे. स्मशानभूमीसाठी जमीन आवश्यक असलेले गाव व शहरात स्मशानभूमी उपलब्ध करून देण्यासंबंधी आवश्यक जमीन राखीव ठेवण्यासाठी शक्मय तेवढे क्रम घेण्याबाबत राज्य सरकारने 2018 साली आदेश बजावला आहे. सरकारी जमीन नसलेल्या ठिकाणी स्मशानभूमीसाठी जमीन घेण्यासाठी 2019-20 सन 2020-21, सन 2021-22 मध्ये 26 कोटी 1 लाख 34 हजार रुपयांचा निधी सरकारने उपलब्ध करून दिला आहे. 2019-20 सालात दहा कोटी, 2020-21 मध्ये दहा कोटी एक लाख 34 हजार 857, सन 2021-22 मध्ये 6 कोटी असा एकूण 26 कोटी 1 लाख 34 हजार 857 रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
बेळगाव तालुक्मयात 123 स्मशानभूमी
बेळगाव तालुक्मयात 123, खानापूर तालुक्मयात 115, हुक्केरी तालुक्यात 63, बैलहोंगल तालुक्मयात 42, कित्तूर तालुक्मयात 21, रामदुर्ग तालुक्मयात 74, गोकाक तालुक्मयात 35, सौंदत्ती तालुक्मयात 119, मुडलगी तालुक्मयात 28, चिकोडी तालुक्मयात 44, निपाणी तालुक्मयात 38, अथणी तालुक्मयात 64, कागवाड तालुक्मयात 16, रायबाग तालुक्मयात 34 अशा 816 गावांमध्ये स्मशानभूमी उपलब्ध आहे.









