71 नवे रुग्ण : 102 जणांची कोरोनावर मात
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव जिल्हय़ातील सक्रिय रुग्णसंख्येत घट झाली आहे. गेल्या आठवडय़ात 2 हजारांवर असलेली रुग्णसंख्या बुधवारी 770 वर पोहोचली आहे तर 71 नवे रुग्ण आढळून आले आहेत. 102 जणांनी कोरोनावर मात केली असून चिकोडी येथील एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 77 हजार 711 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 76 हजार 91 जणांनी कोरोनावर मात केली आहे. मृतांचा सरकारी आकडा 850 वर पोहोचला आहे. अद्याप 3 हजार 477 हून अधिक जणांचे स्वॅब तपासणी अहवाल यायचे आहेत.
आतापर्यंत 10 लाख 36 हजार 448 जणांची स्वॅब तपासणी केली आहे. त्यापैकी 9 लाख 50 हजार 925 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अद्याप 54 हजार 920 हून अधिक जण 14 दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये आहेत.
बुधवारी बेळगावपेक्षाही चिकोडी तालुक्मयातील रुग्णसंख्या अधिक आहे. बेळगाव तालुक्मयात 19 तर चिकोडी तालुक्मयात 21 रुग्ण आढळून आले आहेत. सौंदत्ती, रामदुर्ग, खानापूर तालुक्मयात एकही रुग्ण आढळून आला नाही. कंग्राळी खुर्द, हलगा, खासबाग, अंजनेयनगर, आझमनगर, भाग्यनगर, फुलबाग गल्ली, न्यू गांधीनगर, श्रीनगर, रामतीर्थनगर, शहापूर, शास्त्राrनगर, स्टेशन रोड, टिळकवाडी परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.









