धार्मिक विधींना 50 जणांची मर्यादा : आठवडा बाजाराला परवानगी बंधनकारक
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
जिल्हय़ात रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत कोणीही विनाकारण बाहेर फिरू नये. मात्र, यामधून अत्यावश्यक सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व वैद्यकीय कारणास्?तव रुग्ण आणि त्यासोबत असलेले नातेवाईक यांना सूट देण्यात आली आहे. सदर वेळेत विनाकारण फिरताना आढळल्यास अशा व्यक्तींविरोधात नियमानुसार कारवाई करण्?यात येईल. जिल्हय़ातील सर्व सार्वजनिक ठिकाणी, आस्?थापना, समारंभ, कार्यक्रमस्थळी मास्?क वापरणे बंधनकारक असेल. मास्?क, रुमाल न वापरल्यास 500 रुपये दंड आकारण्यात येईल, असे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत.
सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱया व्यक्तींकडून एक हजार रुपये दंडाची रक्?कम महसूल, पोलीस व स्?थानिक प्राधिकरण वसूल करतील. मास्?क जवळ बाळगून त्याचा वापर न करणे किंवा योग्यरितीने वापर न करणे या बाबीही मास्?कचा वापर न करणे याप्रमाणे समजून दंड आकारण्यात येईल. लग्न समारंभ फक्त 50 व्यक्तींच्या उपस्थितीत पार पाडता येईल. त्यासाठी संबंधित तहसीलदारांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. सांस्?कृतिक कार्यक्रम, क्रीडास्?पर्धा, यात्रा, जत्रा, उरुस इत्यादीचे फक्त धार्मिक विधी केवळ 50 व्यक्तींच्या मर्यादेत करता येतील. त्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. जिल्हय़ातील आठवडा बाजार हे स्?थानिक प्राधिकाऱयांच्या परवानगी शिवाय भरविता येणार नाहीत. पर्यटन स्?थळे, आठवडा बाजाराची ठिकाणे, सर्व सार्वजनिक, धार्मिक स्?थळे, उद्याने, मोकळय़ा जागा, मनोरंजन पार्क, क्रीडांगणे, समुद्र किनारे इत्यादी ठिकाणी एकाचवेळी 50 पेक्षा जास्?त लोकांना एकत्र येण्?यास मज्जाव करण्?यात आला आहे.
कारवाईसाठी पथके
कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी महसूल, पोलीस व संबंधित स्?थानिक प्राधिकरण यांची पथके तयार करण्यात येणार आहेत. सदर पथके सार्वजनिक ठिकाणी, कार्यक्रमस्थळी भेटी देऊन कोविड-19 बाबत तरतुदींचा भंग होत असल्यास दंडात्मक कारवाई करतील. अतिथी, ग्राहकांनी वापरलेली फेस कव्हर, मास्?क, हातमोजे यांची संबंधितांनी योग्यप्रकारे विल्?हेवाट लावावी, असे आदेशही जिल्हाधिकाऱयांनी दिले आहेत.









