बेळगाव तालुक्मयात 116 जणांना बाधा, 56 जण झाले कोरोनामुक्त
-प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव शहर व जिल्हय़ातील 179 जणांना रविवारी कोरोनाची बाधा झाली आहे. यापैकी 116 रुग्ण बेळगाव शहर व तालुक्मयातील आहेत. गेल्या 24 तासांत 16 जण दगावले आहेत. आयसीएमआर प्रयोगशाळा बंद ठेवण्यात आली आहे. प्रयोगशाळेच्या आवारातील कॅन्टीनमधील तीन महिलांना कोरोनाची लागण झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
रविवारी रात्री उपलब्ध झालेल्या माहितीनुसार जिल्हय़ातील एकूण बाधितांचा आकडा 179 इतका आहे. एका बेळगाव तालुक्मयात 116 जणांचा समावेश असून शहर व उपनगरांतील 95 व ग्रामीण भागातील 21 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनामुक्त झालेल्या 56 जणांची सिव्हिल हॉस्पिटलमधून सुटका करण्यात आली आहे.
आदर्शनगर, समर्थनगर, कॅम्प, नानावाडी, पिरनवाडी, कसाई गल्ली, कामत गल्ली, येळ्ळूर, लक्ष्मीनगर-वडगाव, द्वारकानगर-मंडोळी रोड, शाहूनगर, तेग्गीन गल्ली-वडगाव, वंटमुरी कॉलनी, भारतनगर, चांदू गल्ली, शहापूर, सुळेभावी, अमननगर, बसव कॉलनी, टीव्ही सेंटर, मारुतीनगर, मुजावर गल्ली, हनुमाननगर, समादेवी गल्ली, रामतीर्थनगर, खासबाग, गुरुप्रसादनगर, कणबर्गी, रुक्मिणीनगर, हिंदवाडी, शिवाजीनगर, महांतेशनगर, विजयनगर, आझमनगर, कंग्राळी बुद्रुक, शिंदोळी, गुड्सशेड रोड, केदनूर, कडोली, आझादनगर, गणेशपूर, हलगा, कुदेमनी, पांगुळ गल्ली, उज्ज्वलनगर परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या बुलेटिनमधील माहितीनुसार रविवारी 172 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. कोरोनामुळे बेळगाव तालुक्मयातील एकाचा मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षात बाधितांचा आकडा 179 तर मृतांचा आकडा 16 इतका आहे. रविवारी रात्री 8 वाजेपर्यंत सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात 16 हून अधिक मृतदेह ठेवण्यात आले होते.
आरोग्य विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बेळगाव शहर व उपनगरांतील तिघा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. चिकोडी, सौंदत्ती, गोकाक, कुडची (ता. रायबाग), हुक्केरी, बैलहोंगल, मुडलगी येथील 16 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. रविवारी दिवसभरात 14 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. रात्री आणखी 16 मृतदेह शवागारात होते.
जिल्हा सर्वेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार प्रशासनाला आणखी 492 अहवालांची प्रतीक्षा आहे. जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 3628 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 1 हजार 45 हून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 2508 जणांवर सध्या वेगवेगळय़ा इस्पितळांमध्ये उपचार करण्यात येत आहेत. जिल्हय़ातील एकूण 42,728 जणांची स्वॅब तपासणी झाली आहे.
–









