प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोरोना लस कधी येणार याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू होती आता मात्र नवीन वर्षांच्या आधीच लस उपलब्ध होईल आणि महिन्याभरात सगळ्या यंत्रणेपर्यंत ही लस पोचलेली असेल अशी माहिती माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली. पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवेला अधिक प्राधान्य देण्यात येणार आहे. दुसऱया आणि तिसऱया टप्प्यात इतर घटकांना लस उपलब्ध होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिश्रा यांनी दिली.
आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांची यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये 80 शासकीय आरोग्य सेवा आणि 52 खाजगी आरोग्य सेवांचा समावेश आहे. शासन 3 टप्प्यात ही लस देणार आहे. पहिला टप्पा हा आरोग्य विभागाचा असेल असे जिल्हाधिकारी मिश्रा यांनी सांगितले. जिह्यात सर्व प्राथमिक आणि उपजिल्हा रुग्णालयात लस कोल्ड स्टोरेज व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे नवीन वर्ष सर्वांसाठी आशादायक ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सध्या थंडी चे वातावरण असून सर्दी तापाचे रुग्ण वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही सर्दी खोकला म्हणजे कोरोना नव्हे यातून काही प्रवास हिस्ट्री किंवा संशयास्पद असेल तर त्वरित कोरोना टेस्ट करण्यात यावे अशा सूचना आरोग्य यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. तसेच मास्क वापर अनिर्वाहाय असल्याचेही त्यांनी सांगितले.









