1 सप्टेंबरपासून लसीकरणास प्रारंभ, संक्रमित जनावरांच्या संपर्कात आल्यास लागण
प्रतिनिधी /बेळगाव
ब्रुसेलोसिस हा एक संसर्गजन्य रोग आहे. नागरिक संसर्गित प्राणी, दूषित उत्पादनांशी संपर्क साधतात तेव्हा या आजाराची लागत होऊ शकते. दरम्यान संक्रमित जनावरांच्या संपर्कात आल्यास मानवालाही याचा प्रादुर्भाव होऊ शकतो. याचा प्रसार प्रसार रोखण्यासाठी 4 ते 8 महिन्याच्या मादी वासरांना बुसेलॉसिस प्रतिबंधक लस देणे अत्यावश्यक आहे. याकरिता पशुसंगोपन खात्यामार्फत 1 सप्टेंबरपासून बुसेलॉसिस प्रतिबंधक लसीकरण मोहिम हाती घेण्यात येणार आहे. पशुपालकांनी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात जाऊन वासरांना प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावी, असे आवाहन खात्याने केले आहे.
राष्टी^य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत ही लसीकरण मोहिम प्रत्येक पशुवैद्यकीय दवाखान्यात राबविली जाणार आहे. खात्यातर्फे जिल्हय़ात 1 सप्टेंबरपासून प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला प्रारंभ होणार होत असून या रोगापासून जनावरांचा बचाव करण्यासाठी खात्याचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्हय़ात 28,09,109 तर बेळगाव तालुक्मयात 1,78,075 इतकी जनावरे असून विशेष करून ग्रामीण भागात शेतीला जोडधंदा म्हणून मोठया प्रमाणात पाळीव जनावरे पाळली जातात. या जनावरांच्या मादी जातीच्या वासरांना ही प्रतिबंधक लस दिली जाणार आहे.
ब्रुसेला हा जिवाणू बहुतेकदा कच्चे मांस व कच्चा दूधात आढळतो. याचा संसर्ग जिवाणूजन्य हवेत श्वास घेणे, दूषित अन्न खाणे, किंवा संसर्ग झालेल्या प्राण्यांच्या खुल्या जखमांचा संपर्क झाल्यामुळे होतो. संक्रमित झालेल्या प्राण्यांशी जवळून संपर्क आल्यास मानवाला याचा धोका आहे. हा रोग प्राणघातक नसला तरी याचा सतत संसर्ग धोकादायक आहे. संसर्ग झालेल्या पाळीव प्राण्यांचे दूध जिवाणूने दुषित होते. त्यामुळे मानवाला धोकादायक आहे. त्यामुळे ब्रुसेलोसीस रोगापासून बचाव करण्यासाठी पशुपालकांनी आपल्या जनावरांना लस टोचून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
बुसेलोसीसची लक्षणे
- थंडी
- अंगदुखी
- सुस्ती व आळस
- भूक न लागणे आणि वजन कमी होणे.
- पाठ दुखणे, सांधे आणि पोटामध्ये वेदना
डॉ. अशोक कोळळा (उपनिर्देशक पशुसंगोपन खाते, बेळगाव)
राज्याबरोबर जिह्यात देखील 1 सप्टेंबरपासून ब्रुसेलोसिस प्रतिबंधक लसीकरण मोहिम सुरू होणार आहे. सर्व पशुपालकांनी आपल्या 4 ते 8 महिन्याच्या मादी वासरांना ही लस टोचून घ्यावी. ब्रुसेलोसिस हा संसर्गजन्य रोग असल्याने जनावरांपासून माणसाला होऊ शकतो. त्यामुळे रोगापासून बचाव करण्यासाठी प्रत्येक मादी वासरांला ही लस देऊन सहकार्य करावे.









