सक्रिय रुग्णसंख्या 324 वर
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव जिल्हय़ात कोरोना रुग्णसंख्या घटली आहे. बुधवारी केवळ 1 रुग्ण आढळून आला आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासांत एकही रुग्ण डिस्चार्ज झाला नाही. चिकोडी वगळता सर्व तालुक्मयातील रुग्णसंख्या शून्य आहे.
बुधवारी केवळ चिकोडी तालुक्मयातील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. एकूण बाधितांची संख्या 79 हजार 236 वर पोहोचली असून आतापर्यंत 78 हजार 21 जणांनी कोरोनावर मात केली आहे. अद्याप 324 सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर वेगवेगळय़ा इस्पितळांत उपचार करण्यात येत आहेत.
मृतांचा सरकारी आकडा 891 इतका आहे. अथणी, बेळगाव, बैलहोंगल, गोकाक, हुक्केरी, खानापूर, रामदुर्ग, रायबाग व सौंदत्ती तालुक्मयात एकही रुग्ण आढळून आला नाही. आतापर्यंत 12 लाख 43 हजार 509 जणांची स्वॅब तपासणी झाली असून त्यापैकी 11 लाख 54 हजार 949 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. अद्याप 4 हजार 653 जणांचा अहवाल यायचा आहे.









