प्रतिनिधी/ सातारा
जिल्हय़ात अवकाळी पावसाने मंगळवारी सायंकाळच्या सुमारास पुन्हा हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाला होता. वादळी वाऱयासह पडलेल्या तुरळक पावसामुळे कित्तेक ठीकाणी झाडांची पडझड झाली होती. दिवसा उन्हाच्या झळा व सायंकाळच्या दरम्यान ढगाळ वातावण आणि पाऊस पडत असल्याने आरोग्यावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
आधिच कोरोना रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे, त्यातच आता वातावरणात कमालीचा बदल होत असल्याने नागरिकांची याची चांगलीच धास्ती घेतली आहे. त्यामुळे सर्दी खोकला सारखी लक्षणे होऊ नयेत याकरीता दक्षता म्हणून विविध प्रकारची औषधिक काढे करून पिणे, वाफारे घेण्याचे विविध प्रयोग करण्यात येत आहेत.
जिल्हय़ातील जवळपास सर्वच भागात या अवकाळी पडणाऱया वळीवाच्या पावसाने चांगलाच धुमाकुळ माजविला होता. शेतात कापणी करण्यात येत असलेल्या शेतकऱयांची या अचानक पडलेल्या पावसामुळे चांगलीच तारांबळ उडाली. तसेच सध्या लॉकडाऊन असल्यामुळे शहराच्या मुख्य रस्ते ही सुने पडले होते.








